अवघ्या सहा रुपयात नागपूरचा प्रशांत झाला करोडपती
स्थानिक बातम्या

अवघ्या सहा रुपयात नागपूरचा प्रशांत झाला करोडपती

Gokul Pawar

Gokul Pawar

नागपूर : सहा रुपयात कोट्याधीश, स्वप्नवत वाटणारे हे सत्य, आपल्या प्रत्येकालाच अप्रूप करणारे आहे. मात्र, कोट्यधीश होण्याचं स्वप्न नागपूर येथील प्रशांत कुमार यांच्या आयुष्यात वास्तव्यात उतरले आहे. त्यामुळे त्यांना नशिबाने साथ दिल्याने आयुष्यात लॉटरी लागल्यासारखे झाले आहे. यामुळे आता प्रशांत अर्धवट राहिलेल्या अनेक स्वप्नांची पूर्ती करणार आहेत. ह्यामध्ये मुलांच्या शिक्षणासह सह संसारासाठी लागणाऱ्या भौतिक सुखांचा समावेश असेल. ही त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मोठी भेटच ठरली आहे.

गव्हर्मेंट एम्प्लॉयी असलेल्या प्रशांत यांना विकली लॉटरी च्या माध्यमातून आपले भाग्य उजळण्याची संधी मिळाली आहे. कोट्याधीश होण्याचा बहुमान पटकावणाऱ्या प्रशांत यांचा ऑरेंज सिटी नागपूर मध्ये जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला. फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याला कबुतर जा फेम भाग्यश्री आणि नागालँड स्टेट लॉटरीचे संचालक झोथिसा यांची खास उपस्थिती होती. भारतातील लॉटरी क्षेत्रातील मोठी ओळख म्हणून या कंपनीने आपला ठसा उमटवला आहे.

या कंपनीच्या वतीने कोट्याधीश ठरलेल्या प्रशांत यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या चार वर्षापासून कोट्याधीश होईल या आशेवर होतो. त्यासाठी मी नियमितपणे लॉटरीचे तिकीट विकत घेत होतो. तिकिटाची सहा रुपये किंमत ही माझ्या खिशाला परवडणारी होती. याच सहा रुपयांनी माझे नशीब पालटून टाकले आहे. करोडपती होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. याचे खरे श्रेय फ्यूचर गेमिंगच्या लॉटरीला आहे. यांच्या योजनेमुळे मला कुटुंबीयांना वेगळ्या प्रकारची भेट देता येणार आहे, अशी प्रतिक्रिया करोडपती प्रशांत कुमार यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.

आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी लॉटरी हा महत्त्वाचा दुवा आहे. फ्युचर गेमच्या या मोहिमेमुळे हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्यांनी सहा रुपयात करोडपती पुण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या कंपनीचे अभिनंदन करतो. याशिवाय प्रशांत यांना खास सदिच्छा देतो त्यांनी मोठे यश संपादन केले आहे, असे मत नागालँड स्टेट लॉटरी चे संचालक श्री झोथीसा यांनी मांडले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com