चिखलदरा : गाडगेबाबा रोटी अभियान अंतर्गत गरजूंना दोन रुपयांत जेवण; आमदार बच्चू कडू यांचा अनोखा उपक्रम

चिखलदरा : गाडगेबाबा रोटी अभियान अंतर्गत गरजूंना दोन रुपयांत जेवण; आमदार बच्चू कडू यांचा अनोखा उपक्रम

मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चिखलदरा येथे १६ एप्रिलपासून संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये गोरगरिंबासाठी अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊन काळात अनेक राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन गोरगरिबांसाठी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

गाडगे बाबा रोटी अभियान, परतवाडा

गाडगे बाबा रोटी अभियान मागील २ वर्षापासून गरजुंना जेवन पोहचवायचे काम मतदार संघात सुरू आहे. आता कोरोना संकटात गाडगे बाबा रोटी अभियान मार्फत २ रुपयात परतवाडा येथे जेवणाची व्यवस्था..

Bacchu Kadu ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 16, 2020

याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी हा रोटी अभियान सुरू करण्यात आला आहे. चिखलदरा स्टॉप रेस्ट हाऊस परतवाडा या ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला आहे. येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत जेवण उपलब्ध असते. दररोज किमान आठशे लोक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, राज्यात सुरू असलेली शिवभोजन थाळी देखील आता केवळ ५ रुपयांना मिळते आहे. तसेच प्रतिदिन शिवभोजन थाळ्यांची उपलब्ध संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com