ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘हे’ आमदार भूषविणार मंत्रीपद
स्थानिक बातम्या

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘हे’ आमदार भूषविणार मंत्रीपद

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान सकाळी १२ वाजेपासून विधानभवन परिसरात या सोहळा रंगला होता. सुरवातीला राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यांच्यासह २५ मंत्र्यानी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे),धनंजय मुंडे – परळी (बीड),अनिल देशमुख-काटोल (नागपूर), हसन मुश्रीफ-कागल (कोल्हापूर), राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा), नवाब मलिक -अणूशक्तिनगर (मुंबई),राजेश टोपे-घनसावंगी जालना, जितेंद्र आव्हाड-मुंब्रा कळवा (ठाणे),

बाळासाहेब पाटील -कराड उत्तर  (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)- इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री)- श्रीवर्धन (रायगड), संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर), प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर) यांचा समावेश होता. तर जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे मंत्र्यांमध्ये संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ),गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव), दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक), संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद), अनिल परब – मुंबई (विधानपरिषद), उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)शंभराजे देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर) यांचा समावेश होता. या पूर्वीच सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे मंत्र्यांमध्ये अशोक चव्हाण – भोकर (नांदेड),के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार),विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर),अमित देशमुख– लातूर शहर (लातूर),सुनिल केदार – सावनेर (नागपूर),यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती),वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई),अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई),सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद),डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)  यांचा समावेश आहे तर बाळासाहेब थोरात आणि डॉ नितीन राऊत यापूर्वीच मंत्री झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com