पुणे : रुबी हॉल मधील परिचारिकेला कोरोना विषाणूची लागण
स्थानिक बातम्या

पुणे : रुबी हॉल मधील परिचारिकेला कोरोना विषाणूची लागण

Gokul Pawar

पुणे : शहरातील नामांकित रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या इंचार्ज नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. ही बाब आज (दि. १२) समोर आली. त्यामुळे या नर्सच्या सोबत काम करणाऱ्या ३० पारिचारीकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्सला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. यात ही नर्स कोरोना पॉझिटीव्ह आढळली. या नर्सचे वय ५० असून तिच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्येच उपचार करण्यात येत आहेत.

तिच्यासोबत काम करणाऱ्या आणखी ३० परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी काही मुख्य परिचारिकेच्या संपर्कात आल्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या परिचारिकेचा थेट रुग्णांशी संपर्क नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. इतर परिचारिकांना क्वारंटाइन केले आहे, असं रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी सांगितलं.

Deshdoot
www.deshdoot.com