हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पारा ११.०४ अंशावर

file photo
file photo

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हयाच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेने नाशिकच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. नाशिककरांना बोचऱ्या थंडीने घेरले असून आज दि.२८ तापमापकावर ११.४ डिग्री अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. थंडीचा हा जोर येता आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर शुक्रवारचे कमाल तापमान २५.२ डिग्री इतके नोंदवले गेले होते. गेले दोन दिवस असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे थंडी जाणवत नसली तरी शुक्रवारी सायंकाळ नंतर अचानक वाहू लागलेल्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे काहीसे ढगाळ वातावरण असले तरी नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे चित्र होते. पुढील आठवडाभराचा विचार केल्यास थंडीचा हा जोर कायम राहणार असून त्याबरोबरच ढगाळ वातावरणाचा देखील सामना करावा लागणार आहे. आज ( दि.२८ ) ११.४ डिग्री किमान तर २६ डिग्री कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती.
उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी दक्षिणेकडे कूच केल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. पुढील चोवीस तासात वातावरण कोरडे राहणार असल्याने थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
निफाडमध्ये १५. २ अंशाची नोंद 
नाशिकचा कॅलिफोर्निया समजलंल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात देखील बोचऱ्या थंडीची चाहूल जाणवायला सुरुवात झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या तापमापकावर आज (दि.२८) १५.२ अंश नोंद झाली. राज्याच्या सर्वच भागात थंडीचा जोर कायम राहणार असून उत्तर भारतातील लाटेमुळे द्राक्ष उत्पादकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता जाणवू लागली आहे.
असे राहिल पुढील आठवड्यातील तापमान 
रविवार – किमान १४ डिग्री,  कमाल २७ डिग्री ( काही भागात पावसाची शक्यता)
सोमवार – किमान १४ डिग्री , कमाल २७ डिग्री ( वातावरण ढगाळ )
मंगळवार – किमान १४ डिग्री , कमाल  २६ डिग्री ( वातावरण ढगाळ)
बुधवार  –  किमान १३ डिग्री , कमाल  २६ डिग्री ( वातावरण ढगाळ)
गुरुवार –  किमान १२ डिग्री , कमाल २५  डिग्री ( वातावरण ढगाळ)
शुक्रवार –  किमान १२  डिग्री , कमाल – २५  डिग्री ( वातावरण ढगाळ)
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com