Thursday, April 25, 2024
Homeनगरसंचारबंदीचे उल्लंघन; प्रार्थना स्थळी जमलेल्या सहाजणांना घेतले ताब्यात

संचारबंदीचे उल्लंघन; प्रार्थना स्थळी जमलेल्या सहाजणांना घेतले ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- संचारबंदीचे उल्लंघन करून शहरातील नालेगाव परिसरातील एका प्रार्थना स्थळी थांबलेल्या सहा व्यक्तींना कोतवाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दिली. दरम्यान, हे सर्व जण नगर शहरातील रहिवासी असून त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक वाघ यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात भादंवि कलम 144 नुसार संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही शहरातील नालेगाव येथील टांगे गल्ली परिसरात असणार्‍या प्रार्थना स्थळी सोमवारी सायंकाळी सहा व्यक्तींनी प्रवेश केला. याबाबतची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाघ यांना मिळताच त्यांनी पथकाला पाठवून या सहा व्यक्तींना ताब्यात घेतले. ते प्रार्थना स्थळी थांबले होते. सर्व नगर शहरातीलच असल्याचे निरीक्षक वाघ यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या