Thursday, April 25, 2024
Homeनगरलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी

लॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी

मद्यासह 37 लाखांचा ऐवज जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर कार्यालयाने लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील 133 ठिकाणी धाडी टाकून देशी, विदेशी मद्य, गावठी दारू, ताडी, स्पिरिट यासह 10 दुचाकी व चारचाकी वाहन असा सुमारे 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, नगरमधील दोन आणि अकोला येथील एक वाईन शॉपच्या मद्य साठ्यात तफावत आढळून आल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशी माहिती अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. सर्व परमिट रुम व मद्य विक्री दुकानात गर्दी होऊन कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणारऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना दिले आहे.

त्यानुसार लॉकडाउन काळामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर कार्यालयाने नगर जिल्ह्यात १३३ ठिकाणी कारवाई करत ८५ जणांना अटक केली. या कारवाईत अवैद्य देशी-विदेशी मद्य, गावठी दारू, ताडी, स्पिरिट यासह १० दुचाकी व चारचाकी वाहन असा 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केले आहे.

दरम्यान वाईन शॉपच्या मद्य साठ्यात तफावत आढळून आल्याने अकोळनेर (ता. नगर) येथील हॉटेल जंगली धाबा, बोल्हेगाव (ता. नगर) येथील हॉटेल दोस्ती व अकोले तालुक्यातील शेंडी येथील देशी दारू दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या