किआ मोटर्सचा थेट इनोव्हाला टक्कर देण्याचा दावा; लवकरच दाखल होणार नवी MPV
स्थानिक बातम्या

किआ मोटर्सचा थेट इनोव्हाला टक्कर देण्याचा दावा; लवकरच दाखल होणार नवी MPV

Gaurav Pardeshi

नवी दिल्ली :

किआ मोटर्सने लवकरच भारतात लाँच होणारी कार किआ कार्निवलचा व्हिडीओ टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. किआ मोटर्सची ही कार ७ सीटर प्रीमिअम एमपीव्ही असणार आहे. कंपनीने दावा केला आहे कि, कंपनीने दावा केला आहे कि, भारतात या कारची टक्कर थेट प्रसिद्ध टोयोटा इनोव्हाशी होणार आहे.

अनेक नाविन्यपूर्ण असलेल्या या कारमध्ये एका बाजूला स्लायडिंग दरवाजे देण्यात आले आहे. कार्निवल कारची लांबी 5115 एमएम असून रुंदी 1985 एमएम आहे. तसेच उंची 1740 एमएम आणि व्हिलबेस 3060 एमएम आहे. प्रसिद्ध इनोव्हाच्या तुलनेत एमपीव्ही 420 एमएमने लांब आणि 150 एमएमने जास्त रुंद आहे. तसेच इनोव्हाची उंची कार्निवलपेक्षा 55 एमएम जास्त आहे, तर कार्निवलचे व्हिलबेस 310 एमएम जास्त आहे. त्याच प्रमाणे पुढच्या बाजूला सिग्नेचर ग्रिल आहे.

भारतीय बाजारात कार्निवलमध्ये बीएस 6 उत्सर्जन मानकांसह 2.8 लिटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. या इंजिनद्वारे 202 एचपी पॉवर आणि 441 एनएम टॉर्क जनरेट केला जाईल. यासह 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कार्निवल 3.3 लिटर व्ही 6 पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. या इंजिनद्वारे 270 एचपी पॉवर आणि 318 एनएम टॉर्क जनरेट केला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कार्निवल 7, 8 आणि 11 सीट लेआऊटमध्ये आहे. भारतात ही एमपीव्ही फक्त 7 सीटर लेआऊटमध्येच लाँच केली जाऊ शकते. या एमपीव्हीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये कॅप्टन सीट्स मिळण्याचीही शक्यता आहे. दुसऱ्या रांगेतील सीट्स पूर्ण फोल्डेबल असतील, जेणेकरुन तिसऱ्या रांगेतील सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर ये-जा करण्यास सुलभ होईल.

Deshdoot
www.deshdoot.com