कर्जत : सबजेलमधून पाच खतरनाक गुन्हेगारांचे पलायन
स्थानिक बातम्या

कर्जत : सबजेलमधून पाच खतरनाक गुन्हेगारांचे पलायन

Sarvmat Digital

कर्जत (प्रतिनिधी)- कर्जत येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सबजेलमधून तीन खुनी, एक आर्म अ‍ॅक्ट आणि एक बलात्कार प्रकरणातील आरोपी असे पाचजण जेल तोडून पळून गेले आहेत. यामुळे कर्जतमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस जिवाचे रान करीत आहेत.

काल दिनांक 9 रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनचे जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले चार खुनी आरोपी अक्षय रामदास राऊत चंद्रकांत महादेव राऊत (दोघे रा. जामखेड) ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (जवळा, जामखेड) गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. महाळंगी, तालुका कर्जत) हे जेलच्या छतावरील प्लाऊड कटरच्या सहाय्याने कापले. त्यानंतर कौल काढले आणि या पाचही आरोपींनी पलायन केले.

Deshdoot
www.deshdoot.com