Thursday, April 25, 2024
Homeनगरकर्जत : रेशन दुकाने बंद ठेवल्याने डिपॉझिट जप्तची कारवाई

कर्जत : रेशन दुकाने बंद ठेवल्याने डिपॉझिट जप्तची कारवाई

कर्जतमधील दोन दुकानांवर तहसीलदारांची कारवाई

कर्जत (प्रतिनिधी) – अत्यावश्यक सेवा देणारे राक्षसवाडी बुद्रुक आणि वडगाव तनपुरा या गावातील रेशन दुकान कार्यालयीन वेळेत बंद असल्याचे तहसीलदार यांच्या भेटीत आढळून आले. त्यावर कर्जतचे तहसीलदार सी.एम. वाघ यांनी कारवाई केली. तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्यात कार्यालयीन वेळेत दुकान बंद ठेवल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही दुकानचालकांवर डिपॉझिट जप्तची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सी.एम.वाघ यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. गोरगरीब जनतेला शासनाच्या रेशनवरच उदरनिर्वाह करावा लागत आहे. सध्या शासनाकडून लाभार्थींना धान्याचे मोफत वाटप केले जात आहे. मात्र दुकान चालकांकडून मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. तहसीलदार वाघ यांनी मंगळवारी काही रेशन दुकानांना भेटी दिल्या. त्यामध्ये काही दुकाने बंद असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदारांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या