जामखेडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हे दाखल 

File photo
File photo
जामखेड (तालुका प्रतिनिधी)-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जामखेड शहर सह दोन किमी अंतरावर हॉटस्पॉट दि.१४ पर्यंत लागू आहे तर तालुक्यात सचारबंदी लागु असतानाही तोंडाला मास्क न लावता नागरिक विनाकारण फिरताना आढळून आले जामखेड तालुक्यातील खर्डा व नान्नज येथील चौघा इसमांविरोधात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, करोना प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात जामखेड पोलिसांची पथके जामखेड तालुक्यातील खर्डा व नान्नज परिसराच्या गस्तीवर होते. नान्नज गावात पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाला नान्नज मध्ये तीन इसम तर खर्डा शहरात एक असे चौघे इसम  विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिस कर्मचार्यांनी त्यांना हटकले असता त्या इसमांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. सध्या करोनामुळे सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागु आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण विना मास्क लावून घराबाहेर पडण्यावर प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. या निर्बंधाचे जो कोणी उल्लंघन न करेल त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश आहेत. याच आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हेड काँस्टेबल शिवाजी भोस यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील नान्नज येथे तिन  इसमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास नान्नज पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण हे करत आहेत. तर खर्डा शहरात विनाकारण फिरणार्या गितेवाडी एक जण या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे हे करत आहेत. दोन्ही गुन्हे ११ रोजी सायंकाळी दाखल करण्यात आले आहेत.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com