जामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट
स्थानिक बातम्या

जामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट

Sarvmat Digital

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- काेरोना व्हायरसमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून किराणा. पालेभाज्या, चिकन, मटणाच्या भावातही सरासरी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी टोमॅटो २० रुपये किलो होते. अाता ३० रुपये झाले आहेत.

मेथी, शेपू, चुका, पालक पाच रुपयांना जुडी मिळत होती. आता दहा रुपये जुडी झाली आहे. ३० रुपये पावशेर मिळणारा लसूण आता ४० रुपये झाला आहे. भेंडी आणि कोबीच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे. १० रुपये पावशेरने मिळणाऱ्या गवार शेंगा आता २० रुपयांनी विकल्या जात आहेत. कोबीचेही भाव जवळपास असेच आहेत.किराणा माल मध्ये शाबुदाना ६० रुपये किलो चा ७५ व ८० रूपये देत आहे, गोडेतेल ८५ रू कि.चे १०० रूपये किलो ने देत आहे.

शेंगदाणा ८५ रूपया चा ११० व १२० किलो ने देत आहे असे भाव काय जामखेड मधील होलसेल किराणा दुकानादार देत आहे ह्या महागड्या वस्तू मुळे गोरगरीब जनतेचे मरण झाले आहे असे किराणा दुकानदार यांनी आवाच्या सव्वा भाव लोकांना लावले आहे असे जास्त भावाने दुकानदाराने वस्तू देऊ नये अशी मागणी जामखेड तालुक्यातील महिला सह सर्व गोरगरीब नागरिक करत आहेत

बकरा मटण, चिकन आणि अंड्यांचेही भाव वाढले आहेत. मटण ५६० रुपये किलो होते, आता ६०० रुपये किलोने विकले जात आहे. कोरोनामुळे चिकन आणि अंड्यांच्या किमती घसरल्या होत्या. पण, दोन दिवसांमध्ये यात वाढ झाली आहे. चिकन ६० ते ७० रुपये किलोने मिळत होते, आता ते १६० रुपये झाले आहे.

किरणा घाऊक व्यापाऱ्यांनी केलेल्या कृत्रिम टंचाईमुळे नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जामखेड शहर सह तालुक्यातील होलसेल व किरकोळ किराणा दुकानादार व पालेभाज्या जास्त भावाने विकणारे वर तहसीलदार काय कारवाई करणार ह्या गोष्टी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

Deshdoot
www.deshdoot.com