जामखेड : दहा मे पर्यंत जामखेड शहरातील व्हॉटस्पॉट वाढले
स्थानिक बातम्या

जामखेड : दहा मे पर्यंत जामखेड शहरातील व्हॉटस्पॉट वाढले

Sarvmat Digital

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार जामखेड शहर व २ कि मी अंतरावर आज पासून चार दिवस म्हणजे दि. १० मे पर्यंत हॉटस्पॉट परत घोषित करण्यात आले आहे. तसा नविन आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.
जामखेड शहर हे यापूर्वी चार वेळेस हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून शहर पासुन  २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे  या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक १० मे, २०२० रोजी रात्री १२  वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
प्रशासनाने जामखेड शहरात आजपासुन पाचव्यांदा हाॅटस्पाॅट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचा हाॅटस्पाॅट १ मे रोजी संपणार होता आता तो ६ मे पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत मुदत आहे.पण आता हाॅटस्पाॅटमध्ये १० मे पर्यंत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोहच पुरवल्या जाणार आहेत. नागरिकांनी हाॅटस्पाॅट काळात विनाकारण घराबाहेर पडू नये असे अवाहन प्रशासनाने केले आहे.  जर कोणी विनाकारण घराबाहेर पडलात तर गुन्हे दाखल केले जातील असेही आवाहन करण्यात आले आहे
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com