आत्मनिर्भरतेचे पहिले पाऊल नाशकात; स्वदेशी पीपीई किट सीलिंग मशीन तयार

आत्मनिर्भरतेचे पहिले पाऊल नाशकात; स्वदेशी पीपीई किट सीलिंग मशीन तयार

सातपूर : ‘गरज ही शोधाची जननी आहे’ या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय अंबड औद्योगिक वसाहतीतील नानोटे इंजिनिअरिंग या कंपनीने तयार केलेल्या पीपीई किट सीलिंग मशीन द्वारे येतो.

करोना विषाणूच्या आपत्तीमुळे निर्माण झालेली पी.पी. ई. किट ची गरज, गरजेतून प्रयत्न अन् ज्ञानेश्वर नानोटे यांच्या कल्पकतेतून अवघ्या पंधरा दिवसात अभियांत्रिकीचा अविष्कारातून तयार झालेल्या पीपीई किट सीलिंग मशीनच्या रूपात पहावयास मिळतोय.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आत्मनिर्भर होण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत नानोटे यांनी चीन पेक्षाही निम्म्या किमतीत व संपूर्णपणे भारतीय बनावटीचे हे दर्जेदार मशीन बनवले आहे. यात वापरले गेलेले सुटे पार्ट हे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे व बाजारपेठेत सहज उपलब्ध असल्यामुळे याचा देखभाल खर्चही कमी आहे . ह्या मशीन चे वैशिष्ट्य म्हणजे यात हवेचा ५० ते ६० डिग्री पर्यंत तापमानाचा वापर करून सहज सीलिंग करता येते. शिवाय मशीन सीलिंगची गती ही आवश्यकतेनुसार कमी व अधिक करता येते.

अशा प्रकारची आणि स्वस्त मशीन देशात पहिल्यांदाच बनली असल्याने कंपनीने मशीन पेटेंट साठी अर्ज दाखल केलेला आहे. पीपीई कीट ची शिलाई झाल्यानंतर त्या शिलाई मधून करोना वायरस आत जाऊ नये म्हणून शिलाई वरती कंपनीने बनविलेल्या मशीनचा वापर करून गरम हवेच्या साहाय्याने टेप सेंलिंग केला जातो. ज्यामुळे व्हायरस पीपीई कीट च्या आत मानवी शरीरात जाऊ शकत नाही. देशातील नवीन उद्योग करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नव उद्योजकांना संपर्क करण्याचे आवाहन नानोटे यांनी केले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com