Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : फास्टॅगच्या गोंधळाने प्रवाशाला हार्ट अटॅक; पोलीसांनी वाचविले प्राण

इगतपुरी : फास्टॅगच्या गोंधळाने प्रवाशाला हार्ट अटॅक; पोलीसांनी वाचविले प्राण

इगतपुरी । मुंबई नाशिक महामार्गवरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी ( ता. १५ ) मध्यरात्री नंतर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू असताना अचानक एका प्रवाशास हार्ट अटॅक आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी तात्काळ पोलिसांनी प्रवाशास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करीत सुटकेचा निस्वास सोडला.

दरम्यान आज सकाळी आठ वाजल्यापासून फास्टॅगच्या अंमलबजावणीस सुरवात झाली असून घोटी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच अधिकच्या विलंबाने नाशिक मार्गे मुंबईकडे खाजगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशास दुपारी १ वाजे दरम्यान हृदय विकाराचा झटका आला, पोलीसांच्या सतर्कतेने सदर प्रवाशाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी टोल प्रशासनाची रुग्ण वाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. यामुळे प्रशासन सुस्त आहे का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला.

- Advertisement -

अंमलबजावणी सुरु झाल्याने येथील टोलनाक्यावर वाहनांची रीघ दिसून आली. यामुळे अधिक वेळ लागत असल्याने वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी पोलीस अधिक्षक अरुधंती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जालिदंर पळे, घोटी टॅपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, उपनिरीक्षक आनंदा माळी यांसह पोलीस कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला होता. यात पाच अधिकारी व ६५ कर्मचारी तैनात होते. शनिवार रविवार सलग दोन दिवस शासकीय सुट्टी त्यात भाविक, पर्यटक वर्दळीने टोल प्रशासन यांच्यात हमरीतुमरीमुळे पोलीसांच्या मद्यस्तीने वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले.

घोटी टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन सुरू असल्याने दोन्ही बाजुला १ कीमी पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. अखेर अनेक वाहनांची गर्दी झाल्याचे पाहुन टोल प्रशासाने सर्वच लेनवर कॅश घेण्याची सुरुवात केल्याने ही गर्दी आटोक्यात आली. ‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या