Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकलासलगाव : बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; तूर्तास भाव स्थिर

लासलगाव : बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; तूर्तास भाव स्थिर

लासलगाव | वार्ताहर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकमध्ये जोरदार वाढ होत असून देशांतर्गत बाजारात मागणी कायम असल्याने कांद्याचे दर स्थिर पाहायला मिळाले. लाल कांद्याला सरासरी 6 हजार 900 प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तुर्कस्तान या राष्ट्रांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने तेथून भारतात होणारी आयात मंदावल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये तुर्कस्तान मधून आयात मंदालेली आहे.
त्यामुळे लासलगाव बाजार समिती सह जिल्ह्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढूनही भाव स्थिर असल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यापासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवकमध्ये वाढ झाल्याने संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी दिसून आली.
मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने लासलगाव बाजारात कांद्याची आवक ढगाळ वातावरणामुळे मंदावल्याने कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत 17 डिसेंबर रोजी लाल कांद्याला ऐतिहासिक 11,111 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज टप्प्याटप्प्याने घसरण होत कांदा सहा हजार ते आठ हजार क्विंटल असा स्थिर झाला आहे.
नाशिक जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही नवीन कांद्याची आवक चांगलीच वाढलेली आहे मात्र अजूनही मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा समाधानकारक होत नसल्याने कांद्याचे दर हे वाढलेले दिसत आहे. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 1933 वाहनातून लाल कांद्याची 20970 क्विंटल आवक होऊन त्याला कमीत कमी 3000 जास्तीत जास्त 7900 तर सरासरी 6901 रुपये भाव मिळाला.
- Advertisment -

ताज्या बातम्या