सुशांत सिंह राजपूत : टीव्ही सीरिअल ते यशस्वी बायोपिक असा ‘रंजक’ प्रवास थांबला….

सुशांत सिंह राजपूत : टीव्ही सीरिअल ते यशस्वी बायोपिक असा ‘रंजक’ प्रवास थांबला….

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना बॉलिवूड विश्वाला चटका लावणारी आहे.

अवघ्या ३४ व्या वर्षी एका हरहुन्नरी कलाकाराने जगाचा निरोप घेत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सुशांतने कमी वेळातच बॉलिवूड वर आपला ठसा उमटवला होता. त्याने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली.

यानंतर त्याला खरी लोकप्रियता ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूर च्या लोकप्रिय शो मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान पवित्र रिश्तामधील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते. त्यानंतर सुशांतने चित्रपटाकडे आपली पाऊले उचलली. ‘काय पो छे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केले. यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केले.

सुशांतच्या आयुष्यात एम एस धोनी हा चित्रपट खुप महत्वाचा ठरला. भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील सुशांतची भूमिका फार गाजली. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट सुशांत सिंहने धोनीची भूमिका केली होती. तर धोनीच्या बायकोची भूमिकेत अभिनेत्री कियारा अडवाणी होती. हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला. हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू आणि मराठीमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दरम्यान सुशांतने मुंबईस्थित वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. घटनास्थळावरून पोलिसांना काही डॉकमेंट्स प्राप्त झाले आहेत. यावरून सुशातं काही दिवसांपासून नैराश्यावर ट्रीटमेंट घेत असल्याची माहिती मिळते आहे. या घटनेने बॉलिवूड हादरुन गेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com