Video : ‘झुंड…नही सर टीम कहीये टीम’..; टिझर बघाच
स्थानिक बातम्या

Video : ‘झुंड…नही सर टीम कहीये टीम’..; टिझर बघाच

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी महत्वाची भूमिका असलेला व सैराट फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित असलेला झुंड सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला. सर्वानाच उत्सुकता असलेल्या झुंड सिनेमाचे पोस्टर काल रिलीज करण्यात आले. त्यानंतर आज बिग बींच्या दमदार आवाजात टीझरची सुरवात झाली. त्यामुळे आता सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर झुंडच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

झुंड हा बायोपिक असून विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय हे झोपडपट्टीतील मुलांना एकत्र करून फुटबॉलची टीम तयार करतात. या टीझरच्या सुरवातीलाच बच्चे कंपनीची टोळी हातात बॅट , स्टॅम्प, साखळी घेऊन जाताना दिसत आहे. तर महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड नहीं कहिए सर, टीम कहिए’ या संवादाने टीझरची सुरवात होते.

येत्या ८ मे रोजी सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार असून अजय- अतुल या हिट जोडीने या सिनेमाला संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरही या सिनेमात दिसणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com