स्वप्निल जोशीं अभिनित ‘समांतर’ला तीन दिवसात ८० लाखांहून अधिक व्हूज
स्थानिक बातम्या

स्वप्निल जोशीं अभिनित ‘समांतर’ला तीन दिवसात ८० लाखांहून अधिक व्हूज

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका असलेली समांतर ही वेब सिरीज सध्या धुमाकूळ घालत आहे. मागील तीन दिवसात ८० लाखांहून अधिक लोकांनी पहिली आहे. स्वप्नील जोशी बरोबर तेजस्विनी पंडित चा हटके लूक या वेब सिरीज मधून पाहायला मिळत आहे.

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी निर्मिती केली ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ‘समांतर’ ही वेबमालिका सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित असूयात स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. याचबरोबर तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत.

या वेब सिरींजची कथा अशी आहे कि, कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत आहे. या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.

“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे,” असे उद्गार निर्माते अणि ‘जिसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.

Deshdoot
www.deshdoot.com