Video : नागराज मंजुळे साकारणार शिवरायांची महागाथा; प्रोमो बघाच

Video : नागराज मंजुळे साकारणार शिवरायांची महागाथा; प्रोमो बघाच

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी नागराज मंजुळे यांनी आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट दिली आहे. नागराज मंजुळे व रितेश देशमुख लवकरच ‘छत्रपती शिवाजी महाराजांची’ महागाथा साकारणार आहेत. याचा प्रोमो नुकताच नागराज यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून शिवरायांच्या आयुष्यावर अभिनेता रितेश देशमुख चित्रपट बनवणार असल्याची चर्चा सुरु होती. आज शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचा प्रोमो वरून हा चित्रपट रेकॉर्डब्रेक करणार असल्याची चर्चा सोशल माध्यमावर रंगली आहे.

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… (Trilogy)शिवाजीराजा शिवाजीछत्रपती शिवाजीशिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹जय शिवराय !!!Perhaps, this is what called to stand on threshold of a dream….Today, on the occasion of Birth Anniversary of King Shivaji Maharaj, I am so delighted to announce with Ritesh Deshmukh and Ajay-AtulThe Shivaji Trilogy…ShivajiRaja ShivajiChhatrapati ShivajiHappy Shivajayanti🙏🌹Jai Shivrai

Nagraj Manjule ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 19, 2020

“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,” असं म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नागराज म्हणतो, “आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय.. शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)” या ट्विटमधून नागराजने शिवभक्तांना “शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा,” अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com