प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद जोडी तुटली; वाजीद खान यांचे निधन
स्थानिक बातम्या

प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद जोडी तुटली; वाजीद खान यांचे निधन

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक वाजिद खान यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांना किडनीचा आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

बॉलिवूडकरांसाठी हे वर्ष फारसे चांगले नाही असच एकूणच चित्र निर्माण झाले आहे . महिन्याभरापूर्वी अभिनेता इरफान खान आणि ऋषि कपूर यांचे निधन झाले होते. त्यातच आता आणखी एक धक्का फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे.

साजिद वाजीद ही जोडी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणून ओळखली जाते. यातील वाजीद यांनी आज जगाचा निरोप घेतला.

गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, असे संगितकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या.

संगीतकारांमध्ये साजिद-वाजिद प्रचंड लोकप्रिय होती. या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. यातच वाजीद यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com