Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास रुपेरी पडद्यावर!

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास रुपेरी पडद्यावर!

मुंबई : सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

“पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स” द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले “पुण्यश्लोक अहिल्यादेवी” या हिंदी आणि मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. नुकतीच या चित्रपटाचे पोश्टर लॉंच करून घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. धर्म, संस्कृती परंपरा यांचा त्यांनी कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृद्ध केले.

या नावाराणप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे – देशापुढे ठेवला. ही माहिती नव्या पिढीला झाली पाहिजे हा निर्णय निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी घेतला हि विशेष उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांचे मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कौतुक करतो. अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात या चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉंच करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या