Video : ‘इस बार आयेंगे ना तो देख लेंगे सालोंको’; ‘सूर्यवंशी’ आलाय…
स्थानिक बातम्या

Video : ‘इस बार आयेंगे ना तो देख लेंगे सालोंको’; ‘सूर्यवंशी’ आलाय…

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग या तिघांचा ऍक्शन पट असलेला सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अंगावर काटा आणणारा ट्रेलर असून यामध्ये ऍक्शन, थ्रिल बघायला मिळणार आहे.

.रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही सर्वांना उत्सुकताच होती. चित्रपटात अक्षय एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी आला आहे.

येत्या २४ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच खूप पसंती मिळाली आहे. सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच कतरिना कैफ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यासोबतच ‘अजय देवगण आणि रणवीर सिंह हे देखील चित्रपटात आहेत. तसेच गुलशन ग्रोवर, अभिमन्यु सिंह, जॅकी श्रॉफ आणि विवियन भटेना यांच्या देखील चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com