Saturday, April 27, 2024
Homeनगरद्राक्ष मातीमोल, शेतकरी हतबल

द्राक्ष मातीमोल, शेतकरी हतबल

15-30 रूपये किलोने विकण्याची वेळ

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून दिल्याने असलेली जगबंदी तसेच महाराष्ट्रात संपूर्ण देशात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू असल्याने आणि कोरोनाच्या सावटामुळे खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने द्राक्षाचे भाव गडगडले असून उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. एरव्ही 80 ते 120 रूपये किलोने विकले जाणारे द्राक्ष आता 20 ते 30 रूपये किलोने विकले जात आहेत.

- Advertisement -

नेमक्या निर्यातक्षम असणार्‍या द्राक्षबागांना खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने शेकडो द्राक्ष बागांवर कुर्‍हाड कोसळल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

श्रीरामपुरातील उक्कलगावात शेतकर्‍यांनी ऊसाऐवजी यंदा द्राक्षाला पसंती दिली. त्यामुळे या भागात सुमारे 35-40 द्राक्षबागा उभ्या आहेत. पण बागांमध्ये 15 ते 20 रूपये क्विंटलने द्राक्ष विकले जात आहेत. तर 20 ते 40 रूपये किलोने किरकोळ भावाने विकले जात असल्याने शेतकर्‍यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. केसापूर, आंबी तसेच अन्य ठिकाणी द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच, कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.

राहाता तालुक्यात पिंपळस परिसरात 200 ते 250 एकर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. राहाता, साकूरी, अस्तगाव, कोल्हार, ममदापूरमध्ये द्राक्षबागा आहेत. संगमनेरातील जवळे कडलग भागातही द्राक्ष बागा आहेत. तसेच येथे नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष येऊ लागले आहेत. राहुरी, सोनगाव, चिंचविहिरे, गणेगाव, आंबी,

अनेक सौदे मोडले
राहाता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांशी निर्यातीसाठी बाहेरच्या व्यापार्‍यांनी सौदे केले होते. पण पुढे कोरोनाचे संकट उभे राहिल्याने त्यांनी सौदे रद्द केल्याने द्राक्ष बागायतदारांना आता स्वतः द्राक्ष मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. स्वस्तात द्राक्ष मिळत असल्याने ग्राहक खुश आहेत. मात्र उत्पादक संकटात सापडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या