गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक; कट्टा व दोन काडतुसे हस्तगत

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक; कट्टा व दोन काडतुसे हस्तगत
अहमदनगर (प्रतिनिधी) – गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे विक्री करणासाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद शिवारात अटक केली. दत्तात्रय चांगदेव आढाव (वय- ३० रा. वळण ता. राहुरी), संदीप बापु बर्डे (वय- ३० रा. खेडले परमानंद ता. नेवासा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेडले परमानंद ते सोनई रोडवर खेडले परमानंद गावच्या शिवारात पाटाजवळील विटभट्टी परिसरात दोन इसम गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती गुरुवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने विटभट्टी शिवारात सापळा लावला.
दोन इसम संशयितरित्या फिरताना पथकाला आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता कट्टा व काडतुसे मिळून आले. पोलिसांनी ते जप्त करून दोघांना अटक केली आहे. पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपी विरोधात सोनई पोलीस ठाण्यात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com