नगरमध्ये मिळणार अडीच लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी
स्थानिक बातम्या

नगरमध्ये मिळणार अडीच लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी

Sarvmat Digital

पात्र शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द : आधार प्रामाणिककरणाला सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या 2 लाख 50 हजार शेतकर्‍यांची यादी कर्जमाफीच्या पोेर्टलवर शनिवारी (आज) दुपारी एकनंतर प्रसिध्द झाली आहे. प्रसिध्द झालेल्या यादीनूसार लगेच संबंधीत शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणिकरणाला सुरूवात झाली आहे.

राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत प्रयोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावात कर्जमाफी योजनेचे यशस्वी प्रात्याक्षिक घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच वेळी 28 फेबु्रवारीला पात्र शेतकर्‍यांच्या याद्या या पोर्टलवर प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात दीड हजार ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असल्याने आचारसंहितेचे कारण समोर असल्याने कर्जमाफीचा 28 तारखेचा मुहूर्त टळला होता. दरम्यान, नगर जिल्ह्यात अवघ्या दोन गावात ग्रामपंचाय निवडणूक असल्याने आचारसंहितेचा प्रश्न नसल्याने कर्जमाफीची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com