शेत नांगरतांना झाले नागराजाचे दर्शन; सर्पमित्राने दिले जीवदान
स्थानिक बातम्या

शेत नांगरतांना झाले नागराजाचे दर्शन; सर्पमित्राने दिले जीवदान

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी) — ट्रॅक्टरचे सहाय्याने शेताची नांगरट काढत असतांना अचानक नागराजाने दर्शन दिल्याने उपस्थितीतांची चांगलीच पाचावर धारण बसली मात्र सर्पमित्राने नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिल्याने नागाला जीवदान मात्र मिळाले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील रावसाहेब गोर्डे यांच्या शेतात मंगळवार दि.14 रोजी सकाळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट काढण्याचे काम सुरू होते. नांगराचे फाळाने माती-ढेकळा बरोबरच  मोठा लांबच लांब नाग ही वर आला. अचानक नाग बाहेर आल्याने ट्रॅक्टर चालकाची मात्र पाचावर धारण बसली. चालकाने ट्रॅक्टर जागेवरच उभा करून ट्रॅक्टर खाली उडी घेतली.
तो पर्यंत हा नाग ट्रॅक्टरच्या मागील चाका मध्ये जाऊन बसला. चालकाने ताबडतोब गावातील सर्पमित्रांना फोन करून बोलावून घेतले. सर्पमित्र रामू सातपुते याने या नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडुन देऊन जीवदान दिले.
Deshdoot
www.deshdoot.com