प्रसिद्ध बॉस्केटबाँलपटू ‘कोबी’ यांचा १३ वर्षीय मुलीसह अपघाती मृत्यू
स्थानिक बातम्या

प्रसिद्ध बॉस्केटबाँलपटू ‘कोबी’ यांचा १३ वर्षीय मुलीसह अपघाती मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली : अमेरिकेचा जगप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायंट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. यासमवेत त्यांची १३वर्षीय मुलगी गियाना मारिया हिचाही समावेश आहे. यामुळे जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांच्या हेलिकॉप्टरला लॉस एंजिलिस या शहरापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर अपघात झाला. यावेळी हेलिकॉप्टर हवेत असतांना आग लागल्याने हेलिकॉप्टर गिरक्या घेत खाली आले आणि घनदाट झाडीत जमीनवर आदळले. यानंतर हेलिकॉप्टरचा मोठा स्फोट झाल्याने यातील नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला.

कॅलिफोर्निया जवळ हि घटना घडली. या घटनेनंतर बॉस्केटबॉल जगतात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com