फेसबुकवरुन अफवा पसरवली; तरुणावर गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

फेसबुकवरुन अफवा पसरवली; तरुणावर गुन्हा दाखल

Sarvmat Digital

सोनई (वार्ताहर)- स्वतःच्या फेसबुक पेजवरून सोनईत कोरोना बाबत अफ़वा पसरवल्या प्रकरणी सोनई पोलिसांनी मंगळवारी एका तरुणावर गुन्हा दाखल केला.

सोनईतील सागर अरुण खोसे रा. मुळा कारखाना याने स्वतःच्या मोबाईल फोन मधील फेसबुकच्या पेजवरून सोनई परिसरात कोरोना विषाणू संसर्ग विषयी खोटा मजकूर प्रसिद्ध केला. त्यावरून त्याच्यावर पोलीस हवालदार बाबासाहेब अशोक वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून भरतीय दंड विधान कलम 188, 505(2) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51, 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. ई. आव्हाड करत आहेत. दरम्यान यापूर्वीही सोनईत अफवा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com