Tuesday, April 23, 2024
Homeनगरसंगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई

संगमनेरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास होणार कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी) – नोबेल कोरोना विषाणू चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. परंतु दैनंदिन जीवनावश्यक किराणा वस्तु, भाजीपाला, दुध, फळे, औषधी यांना अपवाद केलेला आहे. परंतु काही अपप्रवृत्तीचे इसम याचा गैरफायदा घेवून चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असल्याने अशा नफेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोरोना विषाणूमुळे संचारबंदी आहे. याचा फायदा काही मंडळी उठवत आहे. भाजीपाल्यापासून किराणा मालापर्यंत तर औषधांच्या देखील किमती वाढून विक्री केल्या जात आहे. काही व्यापारी, विक्रेते जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन त्याची कृत्रीम टंचाई निर्माण करत आहे. होलसेल विक्रेत्यांनी याचा फायदा घेवू नये, कृत्रीम टंचाई निर्माण करु नये, देशहित लक्षात घ्यावे, नागरीकांना वेठीस धरु नये, संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तू कमी पडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावे, असे असतांना विक्रेत्यांच्याबाबत काही नागरीकांच्या तक्रारी येत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करुन चढ्या भावाने विक्री करुन नफेखोरी करणार्‍यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व त्या अंतर्गत शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले नियंत्रम आदेशातंर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

जीवनावश्यक वस्तू संचारबंदी काळात कमी पडणार नाही याची प्रशासन काळजी घेत असतांना काही होलसेल विक्रेते मात्र चढ्या भावाने वस्तूंची विक्री करत आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंना उठाव नसला तरी देखील जादा भाव आकारला जात आहे. अशा तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहे. विक्रेत्यांनी वेठीस धरु नये, आजमितीला बाजारासह ग्रामीण भागात साखर 3700 रुपये क्विंटलने विक्री होत आहे.

केवळ 100 ते 150 रुपये भाव वाढला आहे. विक्रेत्यांनी नागरीकांना चढा भाव देवून कृत्रीम टंचाई निर्माण करु नये, साखरेवरील इंटर स्टेट बंदी उठली आहे. तरी पण रास्त नफा घेवून विक्रेत्यांनी व्यवहार करावे, होलसेल विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना रास्त भावाने साखर विक्री व्हावी, त्यावर प्रशासनाने नियत्रंण ठेवावे, असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या