आदेशाशिवाय दुकाने सुरू करू नका
स्थानिक बातम्या

आदेशाशिवाय दुकाने सुरू करू नका

Sarvmat Digital

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून दुकाने सुरू करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली असली तरी या आदेशावर अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळेच नगर जिल्हा प्रशासनाने देखील शनिवारी जिल्ह्यातील आस्थापना आणि दुकाने आदेश मिळाल्याशिवाय सुरू करू नयेत असे आवाहन केलेले आहे.

करोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योग-आस्थापनांना सवलती दिल्या आहेत, त्या वगळता जिल्ह्यातील कोणतीही आस्थापना अथवा दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत, असे प्रशासनकडून शनिवारी दुपारी स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. केंद्राच्या गृह खात्याने काहीही निर्णय घेतला असला तरी राज्यातील करोनाची परिस्थिती, हॉट स्पॉट याची स्थिती पाहून राज्य सरकार देणार्‍या निर्णयानुसार त्या-त्या भागातील स्थिती पाहून प्रशासन निर्णय घेणार आहे. दरम्यान परवानगी शिवाय आस्थापना अथवा दुकाने सुरू करू नयेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com