Thursday, April 25, 2024
Homeनगर38 बाधितांपैकी 24 रुग्ण करोना मुक्त

38 बाधितांपैकी 24 रुग्ण करोना मुक्त

शुक्रवारी चौघा करोनामुक्तांना डिस्चार्ज
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून चौघा करोना बाधित रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते आता करोनामुक्त झाले आहेत. या चौघांना शुक्रवारी दुपारी नगरच्या बुथ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आता संस्थात्मक क्वारंटाईन राहणार आहेत.
यात आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला समावेश आहे.
या रुग्णांसह 24 रुग्णांना शुक्रवार अखेरपर्यंत करोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 12 जणांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एक रुग्ण बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील इतर दोघांना कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, सर्जेपुरा येथील एकालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या रुग्णांच्या 14 दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या काल निगेटीव्ह आल्या होत्या. त्यामुळे आज त्यांना बूथ हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये जामखेड येथील 5, नेपाळहून संगमनेर येथे आलेले 4. नेवासा येथील 2 आणि एक परदेशी असे 12 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात शुक्रवारी आणखी दोघांची वाढ झाली आहे. दरम्यान, गुरूवारी एकाच दिवशी कोरोना बाधितांची संख्या 5 ने वाढली होती.
- Advertisment -

ताज्या बातम्या