Friday, April 26, 2024
Homeनगरबाधित 251, करोनामुक्त 198

बाधित 251, करोनामुक्त 198

 47 अहवालांची प्रतीक्षा : आणखी 12 रुग्णांची करोनावर मात

अहमदनगर (प्रतिनिधी)- शुक्रवारी लोणीच्या प्रवरा इन्स्टिट्यट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील प्रयोग शाळेत करोना पॉझिटिव्ह आलेल्या दोघांची वाढ जिल्ह्याच्या आकडेवारीत शनिवारी करण्यात आली. यामुळे शनिवारी करोना पॉझिटिव्हची संख्या 251 वर पोहचली आहे. तर शनिवारी सकाळी आणखी बारा रुग्णांनी करोनावर मात केल्याने जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्योची संख्या 198 वर पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या करोनाचे अवघे 48 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील प्रयोगशाळेत दोघाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यात राहाता शहरातील 42 व्यक्ती आणि बोरकर वस्ती, पिंपळगाव रोड राहाता येथील 40 वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते. या दोघांची संख्या शनिवारी जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारीत वाढवण्यात आली.

शनिवारी दिवसभर एकही व्यक्तींचा स्त्राव चाचणी अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या प्रयो शाळेतून आला नसल्याचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, काल सकाळी जिल्ह्यातील 10 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्यामध्ये नगर मनपा हद्दीतील 3, शेवगाव 2, संगमनेर 2, राहाता 1 आणि पाथर्डी 2 यांचा समावेश आहे.

तर सायंकाळच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीत आणखी दोघांची करोनातून सुटका झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 198 झाली आहे. शनिवारी दिवसभरातील स्त्राव नमुन्यांची तपासणी रात्रीपर्यंत सुरू होती. 47 अहवाल वेटींगवर असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

3 हजार 348 स्त्राव नमुन्यांची तपासणी
जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत 3 हजार 348 संशयीत करोना रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली. यात 3 हजार 9 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 56, उर्वरित जिल्ह्यातील 134, इतर राज्य 3, इतर देश 8 आणि इतर जिल्ह्यातील 50 रुग्णांचा यात समावेश आहे.

संगमनेरात करोना बाधित महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- शहरातील मालदाडरोड येथील एका 73 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेला करोना लक्षणे आढळून आली होती. मात्र काल रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सदर महिलेचा उपचारादम्यान हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

मालदाड रोड येथील एका 73 वर्षीय महिलेला करोना लक्षणे आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने अधिगृहीत केलेल्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला करोना लक्षणे दिसू लागण्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवालही करोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान तिच्यावर उपचार सुरु होते. काल शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तिला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत सदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. करोना बाधीत महिलेचा मृत्यू झाल्याने संगमनेरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या