जिल्ह्यात सहा नवीन करोना रुग्ण आढळले; जिल्ह्याची रुग्ण संख्या १८३ वर
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात सहा नवीन करोना रुग्ण आढळले; जिल्ह्याची रुग्ण संख्या १८३ वर

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – आज जिल्ह्यात ०६ नवीन रुग्ण आढळले. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आला आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील ३२ वर्षीय युवक बाधितकरोना बाधित आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता.
तर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील १० वर्षीय मुलगाही बाधित तर लालबाग येथून घुलेवाडी (पारनेर) येथे आलेली २८ वर्षीय महिला बाधित आढळली आहे.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील १८ वर्षीय युवक बाधित तर नवघरगल्ली येथील ३२ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.
तर नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५० वर्षीय महिला करोनाची बाधित आहे.
Deshdoot
www.deshdoot.com