Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर, शेवगावसह नगरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण

संगमनेर, शेवगावसह नगरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण

आणखी पाच बाधित : संगमनेरच्या त्या अहवालासह जिल्ह्यात 155 करोना रुग्ण । शिर्डीत वृध्द करोनाबाधित

अहमदनगर (प्रतिनिधी)- सोमवारी जिल्ह्यात आणखी पाच करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात अकोले, संगमनेर, शेवगाव येथील प्रत्येकी एक तर नगर शहरातील दोघा बाधितांचा यात समावेश आहे. संगमनेर येथील खासगी प्रयोग शाळेतील 3 पॉझिटिव्ह अहवालासह जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 155 वर पोहचली आहे. यासह काल तिघे करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील करोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोग शाळेतून सोमवारी सायंकाळी उशीरा आलेल्या अहवालात जिल्ह्यात विखूरलेल्या स्वरूपात पाच करोना बाधित आढळले आहेत. तर 69 अहवाल निगेटिव्ह आलेले आहे.

शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील 30 वर्षीय युवक कल्याण (मुंबई) येथून येऊन आजारी असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल. कल्याण येथे फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह नगर शहरातील माळीवाडा येथील पंचवीस वर्षे युवकाला करोनाची बाधा झाली आहे. घसा दुखी आणि तापाचा त्रास असल्याने त्याच्या स्त्राव नमुना घेण्यात आला होता. यासह भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला करोनाची लागण. खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात 152 करोना बाधित रुग्ण आहेत. मात्र, संगमनेर येथील रुग्णांच्या खासगी प्रयोग शाळेतील 3 पॉझिटिव्ह अहवालाचा समावेश केल्यास जिल्ह्यात 155 करोना बाधित रुग्ण झाले आहेत. यात महानगरपालिका क्षेत्र 25 आणि उर्वरित जिल्ह्यात 77 तर इतर राज्य, इतर देश यांच्या आकडेवारीत कोणताच बदल झालेला नसून इतर जिल्ह्याच्या आकडेवारी सातने वाढ झाल्याने या रुग्णांची संख्या 40 झाल्याचे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे.

अ‍ॅक्टिव्ह केसेस 69
जिल्ह्यात सध्या करोनाच्या 67 आणि संगमनेरच्या 2 अशा 69 अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. आतापर्यंत 2 हजार 507 स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात 2 हजार 242 निगेटिव्ह आले असून रिजेक्टेडचा आकडा 25 जैसे थे असून निष्कर्ष न निघालेल्यांची संख्या 17 असून 71 अहवाल शिल्लक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या