जिल्ह्यात दिवसभरात करोनाचे ०७ रुग्ण वाढले
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात दिवसभरात करोनाचे ०७ रुग्ण वाढले

Sarvmat Digital

जिल्ह्यात करोना बाधिताची संख्या आता ५१
अहमदनगर – संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण करोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये २८ वर्षीय महिला आणि ०५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील करोना बाधित यांची संख्या 51 झाली आहे.
आता आढळून आलेल्या ०२ बाधित व्यक्ती या काल मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत.
Deshdoot
www.deshdoot.com