शेवगाव : ढोरसडे येथे जिवंत नवजात स्त्रीचे अर्भक सापडले

शेवगाव : ढोरसडे येथे जिवंत नवजात स्त्रीचे अर्भक सापडले
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) –  नवजात मुलीचे अर्भक आज तालुक्यातील ढोरसडे येथील उसाच्या सरीत बेवारसपणे टाकुन निर्दयी अज्ञात आरोपीने पोबारा केला. मानवतेला कलंक लावणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेवगाव पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ढोरसडे गावाचे शिवारात बाबासाहेब खंबरे यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आला. सदर महिलांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पहिले असता एक लहान बाळ कपड्यात गुंडाळून उसाच्या सरीत पडलेले आढळून आले. सदर महिलांनी ही घटना  शेतमालकाच्या कानावर घातली. त्यानंतर सरकारी डॉक्टर व पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. पो. नि . रामराव  ढिकले यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
वैदयकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्थानिक बिट कर्मचारी यांनी सदर घटनेचा पंचनामा ढोरसडे येथील उपसरपंच ज्ञानदेव निमसे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांच्या मदतीने केला. सापडलेले अर्भक सरकारी डॉक्टर यांच्या ताब्यात दिलेले आहे. यावेळी अभय लबडे, डॉ श्रावणे, गवळी मॅडम इत्यादी प्रशासकीय अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भा द वि 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि.  ढिकले  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बी.एच.गिरी करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com