Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा : देवगावजवळ मुळा उजव्या कालव्याची पाटचारी फुटली

नेवासा : देवगावजवळ मुळा उजव्या कालव्याची पाटचारी फुटली

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मुळा उजव्या कालव्याची कुकाणा डीवाय क्रमांक 1 ही मुख्य वितरिका  देवगाव येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
याबाब अधिक माहिती अशी की,मुळा उजवा कालव्यातुन सध्या उन्हाळी आवर्तन सुरु असतांना काल मंगळवार दि.28 एप्रिल रोजी दुपारी   कुकाणा डीवाय  क्रमांक 1  ही मुख्य उपवितरीका   या  चारीला भगदाड पडल्याने देवगाव शिवारात लाखो लिटर पाटपाणी वाया गेले.तसेच काही शेतकर्‍यांची पिके  या पाण्याने  जलमय  झाली.   देवगाव  शिवारात  पाटफुटीने  पाणीच पाणी  पाटपाणी चोहिकडे  असे चित्र निर्माण झाले होते.
 कुकाणा-घोडेगाव मार्गावर देवगाव शिवारात आेढे, नालेही या पाण्याने खळखळुन वाहु लागले. पाटपाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या क्षेत्रातील पिके ही चारी फुटल्याने धोक्यात आली आहेत. कुकाणा, चिलेखनवाडी, जेऊरहेैबती, देवगाव, देवसडे, भायगाव शिवारांसाठी ही मुख्य वितरिका (पाटचारी) आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता या चारीचा  भराव फुटल्याने पाटपाण्याची नासाडी झाली. देवगाव शिवारातील शिवाजी पाडळे यांचे  मका व  कांदा पिके पाण्याखाली गेले आहे.  पाटबंधारे अधिकार्‍यांनी याची पाहणी केली. फुटलेल्या चारीची तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे. तो पर्यंत मुख्य कालव्यापासून या वितरिकेचे पाणी बंद करण्यात आलेले आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या