Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

नवी दिल्ली : ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखांचा तिढा सुटला आहे. ‘जेईई-मेन्स’ परीक्षा १८ ते २३ जुलै दरम्यान घेतली जाणार असून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा २६ जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सदर वेळापत्रकाची घोषणा केली. करोनाच्या धास्तीमुळे या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात येत होते. या घोषणेमुळे आता देशातील २५ लाख विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने १६ मार्चपासून देशभरातील विद्यापीठे आणि शाळा बंद करण्याची घोषणा केली होती. २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने नीट आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या.

दरम्यान, नीट आणि जेईई मेन्स परीक्षा होणार असल्याने आता विदयार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळणार आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवार २६ जुलै रोजी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या