कारगिल युद्धातील ‘बहाद्दूर’ मिग- २७ झाले रिटायर
स्थानिक बातम्या

कारगिल युद्धातील ‘बहाद्दूर’ मिग- २७ झाले रिटायर

Gokul Pawar

दिल्ली : १९८५ मध्ये भारतीय वायुसेनेच्या खेम्यात सामील झालेले मिग-२७ ‘हे लढाऊ विमान आज निवृत्त झाले आहे. मागील तीन दशकापासून भारतीय वायुसेनेच्या अनेक कामगिरीमध्ये मिग-२७ या लढाऊ विमानाचा सहभाग राहिला आहे.

दरम्यान कारगिल युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मिग विमानाने आज राजस्थानातील जोधपूर हवाईतळावरून शेवटचे उडाण घेतले. कारगिल युद्धामध्ये ‘मिग’ विमानाने केलेल्या कामगिरीमुळे या विमानाला ‘बहाद्दूर’ असं नाव देण्यात आलं होतं. मिग-२७ या विमानास अलविदा म्हणणारा भारत हा शेवटचा देश आहे. भारताप्रमाणेच हे विमान श्रीलंका, युक्रेन, रशिया या देशांकडेही होते.

‘मिग’ विमाने रशियन बनावटीची असून या विमानाचा वापर जमिनीवरून हल्ला करण्यासाठी केला जात असे. काही वर्षांपूर्वी मिग-२३ निवृत्त झाले आता मिग-२७ देखील निवृत्त करण्यात आलं आहे. कलगीर युद्धात मिग -२७ या विमानाने महत्वाची कामगिरी केली असली तरी काही वर्षांपासून अनेक नकारात्मक घटना घडल्या आहेत. यामुळे मिग-२७ या घटनांसाठी ओळखले जात होते.

Deshdoot
www.deshdoot.com