दिल्लीसह उत्तर भारतात ६. ८ रिश्टर स्केलचा भूकंप
स्थानिक बातम्या

दिल्लीसह उत्तर भारतात ६. ८ रिश्टर स्केलचा भूकंप

Gokul Pawar

दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची नोंद ६. ८ इतक्या रिश्टर स्केलच्या तिव्रतेची नोंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर, गाझीयाबाद, बिहार, गोरखपूर, उत्तर भारत, जम्मू कश्मीर, पाकिस्तान, पाकव्याप्त कश्मीर आदी ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.

दरम्यान सायंकाळच्या सुमारास दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग भूकंपाच्या धक्यांनी हादरला. तसेच पंजाबमधील गुरुग्राम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच परिसरातील इमारतींमधील ररहिवासी बाहेर पडले. काही इमारतींमध्ये सुरक्षा अलार्मही वाजल्याने नागरिकांना भूकंपाची माहिती झाली. साधारण ५० सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

तसेच या भूकंपाचे केंद्र भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानातील हिंदकुश येथील असून या ठिकाणाची तीव्रता ६.८ इतकी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com