डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीत ट्विट; ‘हम रास्ते में हैँ !
स्थानिक बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीत ट्विट; ‘हम रास्ते में हैँ !

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रवासात असून काही तासांतच भारतात पोहचणार आहेत. अशी माहिती खुद्द ट्रम्प यांनी एका हिंदी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलिनिया ट्रम्प, मुलगी इंवांका आणि दोन मुलांसह भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी अहमदाबाद येथील विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासात असताना म्हणजेच काही वेळापूर्वी हिंदीत एक ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात कि, ‘हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे!’ अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या सोशल माध्यमांवर चर्चेचा विषय ठरले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com