अखेर सात वर्षानंतर निर्भयास न्याय; आरोपींना 22 जानेवारीला फाशी
स्थानिक बातम्या

अखेर सात वर्षानंतर निर्भयास न्याय; आरोपींना 22 जानेवारीला फाशी

Gokul Pawar

Gokul Pawar

दिल्ली : अखेर निर्भयाला न्याय मिळाला असून सात वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २२ जानेवारीला चारही आरोपीना तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.

दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज शिक्षेची सुनावणी केली. सुनावणीनंतर १४ दिवसांचा अवधी दिला असून २२ तारखेला सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात चारही दोषींना फाशी देण्यात येईल.

गेल्या सुनावणीत कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दोषींना नोटीस बजावण्यास सांगितले होते. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com