दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर; ८ फेब्रुवारी रोजी मतदान, ११ फेब्रुवारीला निकाल
स्थानिक बातम्या

दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर; ८ फेब्रुवारी रोजी मतदान, ११ फेब्रुवारीला निकाल

Gokul Pawar

Gokul Pawar

दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली च्या निवडणुका घोषित केल्या. या राज्यात ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. येत्या २२ फेब्रवारी २०२० मध्ये दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुतिची तारीख जाहीर केली. दिल्लीतील ७० जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारांना २१ जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर, २२ जानेवारी रोजी निवडणूक नामांकन अर्जाची छाननी करण्यात येणार असून २४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत सद्यास्थितीत पक्षीयबलाबल पाहता आम आदमी पक्ष (आप) ६२, भाजप ४ आणि इतर पक्षाचे ४ सदस्य आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com