नांदगाव : क्रांतीनगर येथील जवान दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी

नांदगाव : क्रांतीनगर येथील जवान दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी

नांदगाव : शनिवारी जम्मू जवान काश्मीरमधील कुपवाडा सेक्टर मधील हिंजवार येथे भारतीय लष्कर आणि आतंकवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच अधिकारी शहीद झाले होते. तसेच दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.

भारतीय लष्कराच्या मोहिमेत तालुक्यातील क्रांतीनगर येथील लष्करी जवान मंगेश नामदेव शिंदे हे जखमी झाले होते. आपल्या मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे वडील नामदेव शिंदे यांनी दिली.

एकीकडे देश कोरोना विषाणूचा सामना करत असतांना दुसरीकडे कश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना उत आला आहे.जम्मू काश्मीरसह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान दहशतवाद्यांच्या तावडीतून पोलिसांची सुटका करण्यासाठी हिंजवार येथे लष्कराच्या तुकडीने केलेल्या सशस्त्र कारवाईत मंगेश शिंदे हाताला गोळी लागून जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले गेले. मंगेश २०१३ मध्ये लष्करात भरती झाला होता. यापूर्वी राजस्थान मधील बिकानेर व बाडमेर येथे सेवा बाजावल्यावर लान्स नायक पदावर बढती मिळाल्यावर काश्मीर येथे त्याची पोस्टिंग झाली होती.

मंगेशचा लहान भाऊ मयूर सुद्धा लष्करी सेवेत आहे. सोमवारी मंगेशने वडिलांशी संपर्क साधून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com