दिल्ली : एनसीआरमध्ये ३.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
स्थानिक बातम्या

दिल्ली : एनसीआरमध्ये ३.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

Gokul Pawar

दिल्ली : एकीकडे कोरोनाची दहशत असताना दिल्लीतील एनआर सी परिसरात आज सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे मुख्य केंद्रापासून आठ किलोमीटर अंतरापर्यंत होते.

दरम्यान देशावर कोरोनाचे सावट असतांना दिल्लीत भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत भुंकप झाल्याच्या माहितीला ट्विटरवरून दुजोरा दिला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आशा आहे की, प्रत्येकजण सुरक्षित आहे. मी तुमच्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो,’ असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे

Deshdoot
www.deshdoot.com