Thursday, April 25, 2024
Homeनगरमनपा कर्मचार्‍यांस मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीसह आठ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची...

मनपा कर्मचार्‍यांस मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीसह आठ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांसह 7 ते 8 जणांनी जबर मारहाण केली होती. मारहाण करणार्‍या मुख्य आरोपीसह आठ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विळदच्या डोंगर परिसरातून जेरबंद केले आहे. यात मारहाण करणाऱ्या आरोपींना आश्रय देणाऱ्या एकाचा समावेश आहे.
निलेश भालचंद्र भाकरे, संजय कुर्लेश इंगळे, प्रशांत राजू म्हस्के (तिघे रा. नागापूर), सुंदर ऊर्फ विकास विजय खंडागळे (रा. वडगाव गुप्ता), प्रदीप भाऊसाहेब कोहक, विजय राजू चौणापुरे, रईस रफफार अन्सारी (तिघे रा. नवनागापूर) व सर्व आरोपींना आश्रय देणारा आकाश पांडुरंग शिंदे (रा. गवळीवाडा, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. यापूर्वी प्रथमेश पाटोळे, गौरव भाकरे, अतुल भाकरे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस या कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. याबाबत नगरसेविकेचा दीर आरोपी निलेश भाकरे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सर्व आरोपी विळद (ता. नगर) परिसरातील गवळीवाडा येथे आकाश शिंदेच्या घरी राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.
गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्यासाठी आकाश शिंदेच्या घरा जवळ सापळा लावला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच आरोपींनी विळदच्या डोंगरात पळ काढला. पोलिसांनी सर्व आरोपींना पाठलाग करून जेरबंद केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली
- Advertisment -

ताज्या बातम्या