चांदवड : परिचरिका पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या
स्थानिक बातम्या

चांदवड : परिचरिका पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : चांदवड येथे अधिपरिचरिकेचा खून करत पतीने आत्महत्या केल्याची घटन घडली आहे. अनिता अण्णा जाधव असे अधिपरिचरिकेचे नाव आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, येथील उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून अनिता जाधव कार्यरत होत्या. दि. २८ रोजी पती अण्णा शिवराम जाधव याने निवासस्थानी अधिपरिचरिका पत्नीचा खून करीत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.

घटनास्थळी चांदवड पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com