क्रिकेटमधील हे दहा अँपायर्स तुम्हाला नक्कीच माहिती असणार?
स्थानिक बातम्या

क्रिकेटमधील हे दहा अँपायर्स तुम्हाला नक्कीच माहिती असणार?

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : क्रिकेट म्हटलं की आठवत बॉल बॅट आणि खेळाडू. पण या सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो, तो म्हणजे पंच. क्रिकेटमध्ये पंचाशिवाय सामन्याला महत्व नाही. जगात असे अनेक अँपायर्स आहेत, त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना जगभर ओळखले जाते.अशाच काही पंचाचा आपण आढावा घेणार आहोत .

रुडी कर्टझन
रुडी इरिक कर्टझन हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांनी एकूण कारकिर्दीत एकूण कसोटी -१०८, वनडे -२०९, टी २०- १४ तर ९ डिसेंबर १९९२ मध्ये आपले अंपायर म्हणून करिअर सुरु केले. आयसीसी ब्रॉन्झ बेल्स पुरस्कार , आयसीसी सिल्व्हर बेल्स पुरस्कार, आयसीसी गोल्डन बेल्स पुरस्कार कर्टझन एकमेव पंच आहेत. ज्यांना वरील तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. फलंदाजाला बाद ठरवताना कर्टझन यांचे हाताचे बोट हळुवारपणे वर येत असे . २०० एकदिवसीय सामन्यात अंपायर म्हणून उभे राहणारे ते पहिले पंच होते .

अलीम दार

अलीम सरवर दार हे पूर्ण नाव असून झांग पंजाब पाकिस्तान येथील आहेत. फलंदाजी उजव्या हाताने गोलंदाजी राईट आर्म लेगस्पिन अंपायर प्रथम श्रेणी कारकीर्द १९९२-९४ मुलतान १९८१-१९८६ लाहोर सिटी प्रथम श्रेणी पदार्पण ३ फेब्रुवारी १९८१ पाकिस्तान रेल्वेज विरुद्ध एडीबीपी कसोटी सामने १३२ वनडे २०८. हे इंटरनॅशनल क्रिकेटचे बेस्ट अंपायर मानले जातात. त्यांनी आपले इंटरनॅशनल पदार्पण पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुजरानवाला येथे १६ फेब्रुवारी २००० रोजी झालेल्या सामन्यातून केले . २००२ मध्ये ते आयसीसी पॅनलचे सदस्य होते. यांना क्रिकेट अंपायरिंगचे लेजंड म्हटले जाते. अलीम दार हे आयसीसीच्या टी २० वर्ल्डकप आयसीसी वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स करंडक अंतिम सामन्याचा महत्वाचा भाग आहेत.

बिली बाऊडन
ब्रेंट फ्रेजर बिली बाऊडन न्यूझीलंड येथील आहेत. पंच होण्याआधी ते एक खेळाडू होते. नंतर त्यांनी अंपायर म्हणून कारकीर्द सुरु केली मार्च १९९५ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या एकदिवसीय सामन्यातून त्यांनी पंच म्हणून पदार्पण केले. २००० मध्ये आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना अंपायर म्हणून निवडण्यात आले. २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय अंपायरिंग पॅनलवर निवड करण्यात आली. १ वर्षानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट विश्वचषकात अंपायर म्हणून बोलवण्यात आले. भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात त्यांची फोर्थ अंपायर म्हणून निवड करण्यात आली. हे त्यांच्या डान्सिंग सिग्नलकरता विशेष प्रसिद्ध आहेत चौकार षटकार आणि कृकेड फिंगर यासाठी ते ओळखले जातात. ही खूण ते फलंदाजाला बाद करण्यासाठी करतात २०१६ मध्ये ते अंपायर म्हणून निवृत्त झाले.

स्टीव्ह बकनर
स्टीफन अँथनी बकनर मोंतेगो खाडी जमेका हे विंडीजचे माजी क्रिकेट अंपायर होते. स्लो डेथ या टोपणनावाने ते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत १२८ कसोटी १८१ वनडे मध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्यांची अंपायर म्हणून कारकीर्द २० वर्षांची होती. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू तसेच प्रेक्षक यांना बकनर हे कधीच आवडले नाहीत. बकनर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण १९८९ मध्ये केले. १०० कसोटी सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम करणारे ते पहिले अंपायर होते.

डेविड शेफर्ड

डेविड रॉबर्ट शेफर्ड इंग्लंड हे पूर्व प्रथम श्रेणी खेळाडू आहेत. शिवाय एक उत्कृष्ट अंपायर आहेत. त्यांनी ९२ कसोटी १७२ वनडे सामन्यात पंच म्हणून काम केले. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी ग्लुस्टेशर संघाचे प्रतिनिधित्व केले. जगातील सर्वात लोकप्रिय अंपायर होत. त्यांनी पंच म्हणून अखेरचा सामना २००५ मध्ये खेळला. शेफर्ड १९९६, १९९९, २००३ या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अंपायर होते. शेफर्ड १११, २२२,३३३ अशी धावसंख्या फलकावर आल्यास एक पाय उचलून आपला आनंद व्यक्त करत असत. डेविड शेफर्ड त्यांच्या काळातील एक उत्कृष्ठ फलंदाज होते. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी करिअर मध्ये १०,०००पेक्षा अधिक धावा केल्या १९७९ मध्ये ते खेळाडू म्हणून निवृत्त झाले. १९८३ विश्वचषकात अंपायर म्हणून सहभागी झाले. १९८५ मध्ये कसोटी सामन्यांत अंपायर म्हणून पदार्पण केले. तेव्हा इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका सुरु होती.

सायमन टोफेल

सायमन जेम्स ऑथर टोफेल हे न्यू साऊथ वेल्स ते ऑस्ट्रेलियाचे अंपायर होते. त्यांनी ५ वेळा आयसीसीचा ‘किताब पटकावला होता. ते मिडीयम फास्ट गोलंदाज होते. शिवाय एक अंपायर होते. टेस्ट ७४, वनडे १७४ अंपायर म्हणून काम केले. त्यांनी वयाच्या २४ वर्षी आपल्या अंपायरिंगच्या करिअरला सुरुवात केली. दुखापतीमुळे त्यांनी आपले करिअर सोडून दिले. आणि अंपायरिंगकडे आपला मोर्चा वळवला १९९९ मध्ये अंपायर म्हणून पदार्पण केले. आणि पुढे निवृत्तीपर्यंत आपले करिअर चालू ठेवले.
कसोटी पदार्पण २००० मध्ये ऑस्ट्रेलिया विंडीज बॉक्सिंग डे कसोटीतून केले.

श्रीनिवास व्यंकटराघवन
श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन हे मद्रास येथील आहेत. फलंदाजी उजव्या हाताने गोलंदाजी राईट आर्म ऑफ ब्रेक करण्यात पटाईत होते. अंपायर म्हणून कसोटी पदार्पण २७ फेब्रुवारी १९६५ रोजी केले. एकदिवसीयमध्ये १३ जुलै १९७४ त्यांनी सुरवात केली आहे. कसोटी अंपायर एकूण सामने ७३, वनडे ५२ तर अंपायरिंगची कारकीर्द १९९३ मध्ये सुरु केली. त्यांनी त्यांचे एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असताना केले पहिल्या दोन विश्वचषकात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. आयसीसी इलाईट पॅनलमध्ये एकमेव भारतीय अंपायर होते. ते ११ वर्ष अंपायरिंग क्षेत्रात कार्यरत होते.

डिकी बर्ड

हेरल्ड डेनिश बर्ड हे स्टेनक्रॉस वेस्ट रायडींग यॉर्कशर येथील पंच आहेत. उपनाव डिकी फलंदाजी उजव्या हाताने गोलंदाजी राईट आर्म ऑफ ब्रेक भूमिका फलंदाज अंपायर १९५६-५९ यॉर्कशर प्रथम श्रेणी १६ मे १९५६ अखेरचा प्रथम श्रेणी सामना १२ ऑगस्ट १९६४ लिस्टशर विरुद्ध इसेक्स कसोटी सामने ६६, वनडे ६९ हे जगातील ऑल टाईम ग्रेट अंपायर होते दुखापतीमुळे फ़ुटबाँल खेळणे सोडून दिले. आणि आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला. पण त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये सरासरी कमी असल्याने १९७० मध्ये अंपायर म्हणून आपले करिअर सुरु केले.

डेरेल हार्पर
डेरेल जॉन हार्पर हे ऑस्ट्रेलियाचे पंच आहेत. उजव्या हाताचे फलंदाज त्यांनी आतापर्यंत ९४ कसोटी तसेच १७४ एकदिवसीय सामन्यात ते पंच होते. १९९८-२०११ या कालावधीत ते कसोटी अंपायर होते. इलाईट पॅनलचे सदस्य होते. प्रथम श्रेणी १९८७ मध्ये पदार्पण केले. १९९४ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात ते पंच होते. १९९८ मध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात पर्थ कसोटीतून पंच म्हणून पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० सामने पूर्ण झाल्यामुळे त्यांना आयसीसी ब्रॉन्झ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १७ वर्ष अंपायर म्हणून काम केले.

टोनी हिल
टोनी हिल हे मूळचे न्यूझीलंड येथील त्यांचे पूर्ण अँथनी लोयड हिल असे आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण ४० कसोटी सामने , ९६ वनडे, २० टी-२० पंच म्हणून काम पाहिले आहे. १७ मार्च १९९८ मध्ये नेपिअर येथे न्यूझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात झालेला सामना हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. २००१ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात हॅमिल्टन येथे झालेला कसोटी सामना हा त्यांचा पंच म्हणून पहिला कसोटी सामना होता. २००९ मध्ये आयसीसीच्या इलाईट पॅनलमध्ये त्यांची निवड करण्यात आली होती.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com