नगर शहरातील ६७ वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू
स्थानिक बातम्या

नगर शहरातील ६७ वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू

Sarvmat Digital

अहमदनगर – नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खासगी मान्यताप्राप्त लॅब कडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
यामुळे जिल्ह्यातील करोना बाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली असून करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता सहा झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, या महिलेच्या निकट सहवासितांचे स्वाब घेण्यात येत असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
Deshdoot
www.deshdoot.com